हर्षदा देशमुख-जाधव यांची ८,८५२ मतांची आघाडी
२१ व्या बाद फेरीनंतरची स्थिती; विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी १ हजार ८१६ मतांची गरज
प्रमुख उमेदवारांची मतस्थिती
विजयाचा कोटा आणि आवश्यक मते
इतर उमेदवारांची मतसंख्या
| उमेदवार | मिळालेली मते |
|---|---|
|
सुनील जबरचंद मोदी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष
|
३,०६६ |
| सोमनाथ जनार्धन साळुंखे | २,६३८ |
| नामदेवराव जाधव | १,९५५ |
| लक्ष्मण साहेबराव हरणावळ | १,४७२ |
सविस्तर बातमी
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. २१ व्या बाद फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत. भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत. त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्यावर ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली आहे. विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख-जाधव यांना आणखी १ हजार ८१६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे पुढील पसंतीच्या मतांच्या मोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुनील जबरचंद मोदी यांना ३ हजार ६६, सोमनाथ जनार्धन साळुंखे यांना २ हजार ६३८, नामदेवराव जाधव यांना १ हजार ९५५, तर लक्ष्मण साहेबराव हरणावळ यांना १ हजार ४७२ मते मिळाली आहेत.
