BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावकऱ्यांचं स्मारकाला साकडं

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावकऱ्यांचं स्मारकाला साकडं | NK News मराठी
NEWS UPDATE
गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाची चर्चा • चुये ग्रामस्थांचे स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर साकडे
● गोकुळ दूध संघ | राजकीय घडामोडी

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर अश्रू आणि श्रद्धेने नतमस्तक होत साकडे घातले.

गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली, सत्तेची गणितं बदलली. आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी शशिकांत पाटील चुयेकर यांना चेअरमन करण्याचा शब्द दिला होता.

गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने बाजी मारली. त्यामुळे गोकुळला उजिर्तावस्था मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्लया त्यांच्या रक्ताचा वारसदार शशिकांत पाटील-चुयेकर यांना न्याय मिळावा, अशी भावना चुये ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पन्हाळा तालुक्यातील पुशिरे येथील सचिन सर्जेराव पाटील या कार्यकर्त्याने कुशिरे ते थेट श्री अंबाबाई मंदिरापर्यंत तब्बल २५ किलोमीटरचा दंडवत घातला.

तर दुसरीकडे, गोकुळ शिरगाव येथील स्व. चुयेकरांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेल्या दूध उत्पादकांनी पुष्पहार अर्पण करताना अभिवादन केले.

■ कोट : ग्रामस्थांच्या भावना

“

"पक्षीय राजकारण आणि खुर्च्यांची ताटातूट शेतकऱ्यांनी खूप पाहिली. पण ज्या माणसाने गोकुळसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलं, त्या आनंदराव चुयेकरांच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आता आली आहे. त्यांच्या मुलाला संधी मिळायलाच हवी."

— विश्वास कोंडिबा शिंदे (कणेरी)
“

"स्व. आनंदराव पाटलांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर शशिकांत पाटलांना चेअरमन करा. सर्व २५ संचालकांनी पक्षभेद बाजूला ठेवून एका सच्चा कार्यकर्त्याच्या पुत्राच्या पाठीशी उभं राहावं."

— सर्जेराव आनंदराव पाटील (गडमुडशिंगी)
“

"तळागाळातील सामान्य दूध उत्पादकासाठी आनंदराव चुयेकरांनी घेतलेले कष्ट आम्ही डोळ्यांनी पाहिलेत. त्या कष्टाची पावती आज त्यांच्या मुलाला मिळायला हवी."

— वसंत ज्ञानू राऊत
थोडे नवीन जरा जुने