BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

कोजागिरी पौर्णिमेला गोकुळची विक्रमी दूध विक्री; ग्राहकांच्या विश्वासाला यशाची जोड

गोकुळ दूध विक्री बातमी
बातमी

कोजागिरी पौर्णिमेला गोकुळची विक्रमी दूध विक्री; ग्राहकांच्या विश्वासाला यशाची जोड

दूध संकलनाबरोबरच दूध विक्री आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन व विक्रीवरही गोकुळने भर दिला आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी आणि पेढा यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. ग्राहकांना दर्जेदार पदार्थ वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी मार्केटिंग आणि वितरण विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

या यशामध्ये दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदारांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले.

विक्रमी दूध विक्रीसाठी प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील तसेच मार्केटिंग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी गोकुळ परिवाराच्या वतीने सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार आणि हितचिंतकांचे आभार मानून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर
थोडे नवीन जरा जुने