BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

गोकुळच्या अध्यक्ष निवडीत महायुती तांत्रिक मुद्दा उपस्थित करणार नाही; सतेज पाटलांचा विश्वास

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीच्या सभेत महायुतीकडून कोरमचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला जाणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. विरोधी गटाचे सर्व १२ संचालक सभेला उपस्थित राहतील आणि गोकुळच्या अध्यक्षपदावर आमचाच उमेदवार विराजमान होईल, असा दावाही त्यांनी केला.

पुण्यात रविवारी माध्यमांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोरमचा मुद्दा चर्चेत असला, तरी संचालक मंडळातील बहुमत आमच्या बाजूने आहे. विरोधकांनीही आम्हाला मिळालेल्या बहुमताचे स्वागत केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रात चुकीचा पायंडा पाडला जाणार नाही, अशी खात्री आहे.

 


मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे आणि संजय मंडलिक यांनी सहकार क्षेत्रात काम केले आहे. त्यामुळे ते अध्यक्ष निवडीच्या सभेत तांत्रिक अडचण निर्माण करणार नाहीत. चुयेकरांच्या मुलाला अध्यक्ष करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सहकार्य करतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना, बहुमत आमच्या बाजूने असल्याने अध्यक्ष आमचाच होणार, यात कोणतीही शंका नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

 

थोडे नवीन जरा जुने