BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार

NK NEWS मराठी

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या

EDUCATION NEWS
अभिमानाची बातमी

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार!

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या महाराष्ट्र-गोवा विभागाकडून पुरस्कार जाहीर

कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील “बेस्ट पॉलिटेक्निक” पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र-गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.

महाराष्ट्रातील बेस्ट पॉलिटेक्निक

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र-गोवा विभाग

पुरस्कार वितरण स्थळ : गोवा
पुरस्कार वितरण दिनांक : २ नोव्हेंबर

विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची दखल

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थी-केंद्रित उपक्रम सातत्याने राबविले जातात. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पॉलिटेक्निकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (एम. एस. बी. टी. ई.) यांच्याकडून एक्सलंट श्रेणी प्राप्त झाली आहे.

विविध क्षेत्रांतील कामगिरीची दखल

पॉलिटेक्निकमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांचे परीक्षांमधील निकाल, क्रीडा स्पर्धेतील यश, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, उद्योग क्षेत्राबरोबर केलेले सामंजस्य करार, शिक्षकांसाठी राबविलेले प्रोत्साहनपर व संशोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मिळालेले पेटंट, विद्यार्थ्यांनी सुरू केलेले स्टार्टअप, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत माजी विद्यार्थ्यांशी सुसंवाद तसेच 'हिरकणी मंच'च्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी राबविलेले वैविध्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यांची दखल घेऊन पॉलिटेक्निकला हा पुरस्कार मिळाला आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

अभिनंदन करणारे पदाधिकारी

  • डॉ. संजय डी. पाटील — संस्थेचे अध्यक्ष
  • आमदार सतेज पाटील — संस्थेचे उपाध्यक्ष
  • माजी आमदार ऋतुराज पाटील — विश्वस्त
  • पृथ्वीराज पाटील — विश्वस्त
  • डॉ. ए. के. गुप्ता — कार्यकारी संचालक
  • श्रीलेखा साटम — सीएचआरओ

पुरस्कारासाठी सर्वांचे परिश्रम

या पुरस्कारासाठी प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे, प्रा. सचिन पाटील तसेच सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

पुरस्कारासाठी परिश्रम घेणारे

प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे, प्रा. सचिन पाटील तसेच पॉलिटेक्निकमधील सर्व स्टाफ.

बातमी : NK News मराठी

NK NEWS मराठी

कोणाचंही भय नाही | कोणताही अजेंडा नाही | फक्त सत्य आणि समाजहित

थोडे नवीन जरा जुने