कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दासाहेब) यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात कुलपती तथा ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातही जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून दासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील यांच्यासह संस्थांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक विकासासाठी डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत दोन्ही विद्यापीठांमध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
