BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध : कौस्तुभ गावडे कोल्हापुरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी; शिक्षकांशी विविध प्रश्नांवर संवाद

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी कोल्हापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी देऊन प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधला. या भेटींदरम्यान शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची ग्वाही गावडे यांनी यावेळी दिली.


या दौऱ्यात महावीर महाविद्यालय (स्वायत्त), नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांना भेटी देण्यात आल्या. या संस्थांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी गावडे यांचे स्वागत केले.

महावीर महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. ए. डी. जोशी, दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद आणि कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. गोमटेश पाटील यांच्यासह शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते. नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दि मोहमेडन एज्युकेशन सोसायटी तसेच मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनी आजरेकर, स्कूल कमिटीचे चेअरमन रफीक शेख आणि मुख्याध्यापक काजे सर यांच्याशी शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा झाली.

गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज येथे चेअरमन डॉ. मंजिरी अजित मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिलचे दौलत देसाई, सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य वाय. डी. पाटील, प्रा. पी. बी. झावरे आणि प्रा. आनंद मेणसे उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रयत्न करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, डॉ. अनिल मालगुडे, डॉ. के. एन. देसाई आणि NAAC समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर यांच्यासह मान्यवरांनी गावडे यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान शिक्षकांनी त्यांच्या विविध अपेक्षा आणि प्रश्न मांडले.

शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिक्षकांचे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता त्यावर प्रभावी पाठपुरावा झाला पाहिजे, अशी भूमिका या संवादातून अधोरेखित झाली.

शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण आणि शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास यासाठी संवाद व समन्वयाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला.


थोडे नवीन जरा जुने