BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

कॅसिनोतील पैशांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; नग्न करून व्हिडिओ व्हायरल

 कोल्हापूर : गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगारातून जिंकलेल्या पैशांच्या वसुलीसाठी एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाला नग्न करून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आकाश चंद्रकांत मुळे (वय ३५, रा. जुना राजवाडा, कोल्हापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आकाश हे गोव्यातील कॅसिनोमध्ये अधूनमधून जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कॅसिनोमध्ये जुगारातून मोठी रक्कम जिंकल्याची माहिती आरोपींना मिळाल्यानंतर त्यांनी आकाशकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.


दरम्यान, आकाश यांचा मित्र सोनू ऊर्फ ओंकार वायफळकर याने त्यांच्या मोबाईलवर शिवाजी पेठ परिसरातील एका ठिकाणी आकाशला नग्न केल्याचा व्हिडिओ पाठवला. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. आकाश यांच्या फिर्यादीवरून फरुख खान, विक्रम पाटील, देवा सूर्यवंशी आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १० सप्टेंबरच्या रात्री आकाश यांना न्यू शाहूपुरी परिसरात बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी त्यांना चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून परीख पुलावरून टेंबलाई मार्गे गोकुळ शिरगाव परिसरातील महामार्गालगतच्या माळरानावर नेले. तेथे त्यांना मारहाण करून कपडे काढण्यात आले. तसेच त्यांच्या पॅन्टच्या खिशातील सुमारे ३० हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे. कॅसिनोतील पैशांच्या वसुलीसाठी हा प्रकार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद असून, या प्रकरणाचा पुढील तपास जुना राजवाडा पोलिस करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने