BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

महाराष्ट्रातील युवकांना परदेशी रोजगाराची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, जपान आणि रशिया यांसह विविध देशांमध्ये कौशल्य विकास, भाषा प्रशिक्षण, नर्सिंग तसेच अन्य क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 21 सप्टेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या गोलमेज परिषदेत याबाबत चर्चा करण्यात आली.


या परिषदेला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, प्रोटोकॉल मंत्री जयकुमार रावल, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कौशल्य विकास आयुक्त तसेच महिमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह संबंधित देशांचे दूत उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने महिमा संस्थेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या माध्यमातून राज्यातील युवकांसाठी परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. युवकांना परदेशात रोजगारासाठी आवश्यक कौशल्य व भाषा प्रशिक्षण देण्याबरोबरच परदेशात जाण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासही या संस्थेमार्फत मदत केली जाणार आहे.
परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या कुशल युवकांची सुरक्षितता, गरज भासल्यास कायदेशीर मदत तसेच सुरक्षित परतण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याची जबाबदारीही महिमा संस्थेकडे राहणार आहे. सुरक्षित आणि कायदेशीर मार्गाने परदेशी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, युवकांचे कौशल्य वाढवणे आणि त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा, यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष निवेदन केले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण, भाषा प्रशिक्षण आणि परदेशी रोजगार मार्गदर्शनाची प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी त्यांनी केली.
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर जागतिक रोजगार बाजारपेठेत संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका क्षीरसागर यांनी मांडली. परदेशात रोजगार मिळाल्यामुळे परकीय चलन भारतात येण्यास मदत होऊन युवकांच्या आर्थिक प्रगतीसोबतच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होऊ शकतो.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘पॉलिसी पेपर ऑन ग्लोबल सर्क्युलर वर्कफोर्स मोबिलिटी फॉर महाराष्ट्र, 2026’ या धोरणात्मक मसुद्याचे प्रकाशन केले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील युवकांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या नव्या संधींचे मार्ग खुले होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


थोडे नवीन जरा जुने