यंदा शिवसेनेची
“विकासाची भगवी दहीहंडी”
नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर
दि. ५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगणार दहीहंडीचा थरार
कोल्हापूर दि.०३ : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या माध्यामातुन कोल्हापूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार वहिनी यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने कोल्हापुरातील विकासकामांसाठी गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.
यामाध्यमातून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांनी शहरात विकासकामांचे अनेक नवे थर रचले जात आहेत आणि या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा आलेख उंचावला आहे.
🏗️ कोल्हापूरच्या विकासाला नवे थर
यामध्ये प्रामुख्याने पूर नियंत्रण प्रकल्प, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रस्ते, रंकाळा सुशोभिकरण, गांधी मैदानाचे काम, केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण या प्रमुख विकासकामांसह सर्किट बेंच, आय.टी.पार्क, महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कायम करणे अशा कामांमुळे कोल्हापूर नव्या रुपात परिवर्तीत होताना दिसत आहे.
कोल्हापुरातील प्रमुख विकासकामे
पूर नियंत्रण प्रकल्प
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा
रस्ते विकास
रंकाळा सुशोभिकरण
गांधी मैदानाचे काम
केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण
सर्किट बेंच
आय.टी.पार्क
महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कायम करणे
आगामी काळातही असेच कोल्हापूरच्या विकासाचे थर रचण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, यंदा शिवसेनेच्या वतीने “विकासाच्या भगव्या दहीहंडी” चा दि.०५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे थरार रंगणार असल्याची माहिती युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पुढे म्हंटले आहे कि, महायुतीच्या हिंदुत्ववादी सरकारने सर्व हिंदू उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे.
हिंदुत्वाचा हा आपला आवडता उत्सव राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शिवसेनेच्या "विकासाची भगवी दहीहंडी" चे आयोजन करण्यात आले आहे.
गेली १९ वर्षे अखंडितपणे "भगवी" दहीहंडीचे आयोजन करण्यात येते आहे.
🏆 दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी
इतके भव्य बक्षीस!
यासोबतच इतर आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
यावर्षी दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला रु.१ लाख ११ हजार १११ इतके बक्षीस देण्यात येणार असून, इतर आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
तरी या दहीहंडी स्पर्धेत जास्तीत जास्त गोंविंदा पथकांनी सहभाग घ्यावा आणि कोल्हापूर वासियांनी या दहीहंडीचा थरार पाहण्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहनही नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केले आहे.
🚩 कोल्हापूरकरांनो, आवर्जून उपस्थित राहा!
दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून
छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर
-
📅 दिनांक:
०५ सप्टेंबर २०२६ -
⏰ वेळ:
सायंकाळी ५ वाजल्यापासून -
📍 ठिकाण:
छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर -
🏆 प्रथम बक्षीस:
रु. १ लाख ११ हजार १११ -
🚩 आयोजक:
शिवसेना -
👤 मार्गदर्शन:
आमदार राजेश क्षीरसागर -
🧑💼 माहिती:
युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर
वर्षे अखंडित भगवी दहीहंडी
दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्यदिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रु. १,११,१११
दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला भव्य बक्षीस देण्यात येणार आहे.
याशिवाय इतर आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
