BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली

डॉ. डी. वाय. पाटील श्रद्धांजली वृत्त
विशेष बातमी / शोकसभा

*डॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली*

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शोकसभा

माजी राज्यपाल तथा डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांना आदरपूर्वक श्रद्धांजली

माजी राज्यपाल तथा डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचे विचार, कार्य अमर आहे. त्यांच्या मूल्यांचा आणि विचारांचा वारसा विविध क्षेत्रांत पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरले, अशा शब्दांत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी भावना व्यक्त केल्या. विद्यापीठात आयोजित शोकसभेत विविध मान्यवरांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना आदरांजली वाहिली.


माजी राज्यपाल, डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विद्यापीठात गुरुवारी शोकसभा झाली.

मान्यवरांचे मनोगत व श्रद्धांजली

डॉ. राकेश कुमार शर्मा (कुलगुरू)

"डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ संस्था उभारल्या नाहीत, तर उत्कृष्टता आणि गुणवत्तेची संस्कृती निर्माण केली. हजारो विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे जीवन त्यांनी घडवले. प्रत्येकाला नावाने ओळखण्याची त्यांची विलक्षण स्मरणशक्ती आणि प्रत्येकाशी असलेला वैयक्तिक जिव्हाळा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या मूल्यांचा आणि विचारांचा वारसा अधिक ताकदीने पुढे नेऊया."

डॉ. व्ही. व्ही. भोसले (कुलसचिव)
‘फुलाला फुलण्यात, कळीला उमलण्यात आणि माणसाला जगण्यात आनंद असला पाहिजे’

हा दादासाहेबांचा जीवनदृष्टिकोन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ते वटवृक्षासारखे आश्रयदाते, आशेचे किरण, दातृत्वाची मूर्ती आणि ज्ञानाचा अथांग महासागर होते. शिक्षण क्षेत्रातील महामेरू म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.

डॉ. राजेश ख्यालप्पा (अधिष्ठाता, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज)

देशाच्या विकासासाठी शिक्षण हाच सर्वात मोठा मार्ग असल्याचा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली प्रत्येक संस्था नव्या उंचीवर पोहचली.

डॉ. शिंपा शर्मा (संचालिका, अंतर्गत दर्जा हमी कक्ष)

समाजपरिवर्तनासाठी त्यांची अखंड धडपड, प्रत्येक व्यक्तीशी जुळणारा संवाद आणि तालमीचा आखाडा ते राज्यपालपदापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श आहे.

श्रीलेखा साटम (सी. एच. आर. ओ.)

दादासाहेबांनी एका आयुष्यात असंख्य आयुष्य घडवली. ज्ञान, नम्रता आणि सेवाभावाचे विचार त्यांनी समाजाला दिले. हजारो कुटुंबांना रोजगार, शिक्षण आणि नवे आयुष्य देणारे ते खरे कर्मयोगी होते.

डॉ. वैशाली गायकवाड (वैदयकीय अधीक्षिका)

त्यांच्या शिकवणी व मार्गदर्शनामुळे आयुष्यभर योग्य दिशा मिळत राहील.

संजय जाधव (उपकुलसचिव)

चार दशकांच्या सहवासातील आठवणी सांगताना त्यांनी नमूद केले की, दादासाहेबांनी कधीही कोणावर टीका केली नाही, उलट प्रत्येकाला धाडस, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार दिले.

यावेळी इतर उपस्थित व भावना व्यक्त करणारे मान्यवर:
  • मनीषा विजापूरकर - उपप्राचार्य, नर्सिंग कॉलेज
  • डॉ. अर्पिता पांडे -तिवारी - सेंटर फॉर इंटर डीसीप्लेनरी स्टडीज
  • डॉ. अमृता डोईजड - फिजिओथेरपी विभाग
  • डॉ. चंद्रप्रभू जंगमे - प्राचार्य, फार्मसी कॉलेज
  • रुधिर बारदेसकर - प्राचार्य, स्कूल ऑफ हॉस्पिटीलीटी
  • डॉ. अजित पाटील - संचालक, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट

भावपूर्ण श्रद्धांजली

यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ | सर्व हक्क राखीव

थोडे नवीन जरा जुने