पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या रक्षाविसर्जनाचा विधी आज, गुरुवार (दि. ६ ऑगस्ट) सकाळी १० वाजता पॅव्हेलियन ग्राउंड, कसबा बावडा येथे होणार आहे.
शिक्षण, समाजकारण, वैद्यकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवणाऱ्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नागरिक, विद्यार्थी, मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांना कायम दिशा देत राहील. 🙏
