BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

कोल्हापूर पूर आणि पाऊस अपडेट

कोल्हापूर पूर आणि पाऊस अपडेट
लाइव्ह अपडेट

जिल्ह्यात ४४ बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात ३.१५ टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर | दिनांक ६ जुलै २०२६

सरासरी पाऊस
45.6 मि.मी.
पाण्याखालील बंधारे
44
बंद रस्ते
20
प्राथमिक नुकसान
1.26 कोटी

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून तब्बल ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील मुख्य राधानगरी धरणात सध्या ३.१५ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून सध्या कोणताही विसर्ग सुरू नसल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. रेल्वे, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक मात्र अद्याप सुरळीत सुरू आहे.

तालुकावार पावसाची नोंद (सकाळी १० वाजेपर्यंत)
तालुका / परिसर पाऊस (मि.मी.)
गगनबावडा (सर्वाधिक) 103.3
राधानगरी65.7
वारणानगर परिसर57.7
पन्हाळा57.6
आजरा52.3
करवीर48.4
कागल43.3
गडहिंग्लज36.8
भुदरगड30.4
हातकणंगले16.0
शिरोळ12.4
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (टीएमसी)
धरण पाणीसाठा (TMC) धरण पाणीसाठा (TMC)
राधानगरी3.15चित्री0.63
वारणा7.71जंगमहट्टी0.49
तुळशी1.34घटप्रभा1.55
दूधगंगा3.13जांबरे0.57
कासारी1.05आंबेआहोळ0.69
कडवी1.01सर्फनाला0.39
कुंभी1.11धामणी1.05
पाटगाव1.44कोदे (लघु)0.21
चिकोत्रा0.53--
नदीनिहाय पाण्याखाली गेलेले एकूण ४४ बंधारे
पंचगंगा नदी: शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ
भोगावती नदी: सरकारी कोगे हळदी खडक कोगे राशिवडे
तुळशी नदी: कसबा बीड आरे
कासारी नदी: यवलूज ठाणे आळवे पुनाळ तिरपण बाजार भोगाव वालोली कांटे पेंडाखळे
कुंभी नदी: शेणवडे कळे सांगरूळ मांडुकली
वारणा नदी: कोडोली मांगलेसावर्डे
दूधगंगा नदी: दत्तवाड सिद्धनेर्ली
वेदगंगा नदी: कुरणी बस्तवडे चिखली निळपण वाघापूर सुरुपली गारगोटी म्हसवे करडवाडी शेणगाव
हिरण्यकेशी व घटप्रभा: साळगाव (हिरण्यकेशी) कानडे-सावर्डे (घटप्रभा)
पंचगंगा व इतर ठिकाणची पाणीपातळी (फुटात)
स्थान / बंधारा पातळी (फूट)
राजाराम32.11
सुर्वे31.00
रुई60.6
इचलकरंजी56.8
तेरवाड50.9
शिरोळ40.3
नृसिंहवाडी36.0
राजापूर26.3
सांगली (सांगली जिल्हा)12.6
अंकली (सांगली जिल्हा)15.9
वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते (एकूण २०)
  • प्रमुख जिल्हा मार्ग : ०५
  • ग्रामीण मार्ग : ०५
  • इतर जिल्हा मार्ग : ०२
  • जिल्हा परिषद रस्ते : ०८
रेल्वे, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान प्राथमिक अंदाज (एकूण: १.२६ कोटी)
तालुका अंदाजित नुकसान
राधानगरी (सर्वाधिक)४२.७५ लाख रु.
गगनबावडा२३.५० लाख रु.
कागल२१.२२ लाख रु.
करवीर१६.५० लाख रु.
पन्हाळा११.९२ लाख रु.
गडहिंग्लज११.११ लाख रु.
चंदगड१.५० लाख रु.
आजरा८८ हजार रु.
* हातकणंगले, शिरोळ व भुदरगड तालुक्यांत अद्याप कोणतीही आर्थिक हानी नोंदवलेली नाही.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन:

नागरिकांनी पाण्याखाली गेलेले बंधारे, पूल व रस्ते यांवरून प्रवास करणे पूर्णपणे टाळावे. पूरपरिस्थिती पाहता प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व सुरक्षित राहावे.

© २०२६ कोल्हापूर जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभाग | माहिती स्रोत: जिल्हा प्रशासन अधिकृत अहवाल

थोडे नवीन जरा जुने