BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'एक्सलंट' श्रेणी

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक वृत्त

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'एक्सलंट' श्रेणी


कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (एम. एस. बी. टी. ई.) यांच्याकडून 'एक्सलंट' श्रेणी प्राप्त झाली आहे. तर मेकॅनिकल आणि सिव्हिल या शाखांना 'व्हेरी गुड' ही श्रेणी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये झालेल्या अकॅडमीक मॉनिटरिंगनुसार ही श्रेणी मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.

शाखानिहाय मानांकन
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग & सायन्स एक्सलंट (Excellent)
मेकॅनिकल & सिव्हिल इंजिनीअरिंग व्हेरी गुड (Very Good)

तज्ज्ञ समितीकडून सखोल तपासणी

गेल्या वर्षभरातील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांचे परीक्षांमधील निकाल, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, उद्योग क्षेत्राबरोबर केलेले सामंजस्य करार आणि शिक्षकांसाठी राबविलेले प्रोत्साहनपर व संशोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मिळालेले पेटंट आदी बाबींची तपासणी एम.एस. बी. टी. ई. तज्ज्ञांच्या समितीकडून केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार पॉलिटेक्निकला ही श्रेणी मिळाली आहे.

'हिरकणी मंच' च्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी राबविलेले वैविध्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही (Placements) विशेष दखल समितीने घेतली.

मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी सर्व स्टाफचे विशेष अभिनंदन केले.

यशस्वी परिश्रमी टीम
प्राचार्यडॉ. महादेव नरके
उपप्राचार्यनितीन माळी
रजिस्ट्रारमहेश रेणके
विभाग प्रमुखडॉ. पी. के. शिंदे
प्राध्यापकप्रा. एस. बी. शिंदे
प्राध्यापकप्रा. अक्षय करपे
प्राध्यापकप्रा. शीतल साळोखे

तसेच सर्व टीचिंग आणि नॉन-टीचिंग स्टाफ यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

© 2026 NewssKatta Digital Services. सर्व हक्क सुरक्षित.
थोडे नवीन जरा जुने