BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यांमध्ये निवड

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी - प्लेसमेंट न्यूज
मेगा पूल कॅम्पस ड्राइव्ह उत्साहात

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यांमध्ये निवड

नामांकित औषधनिर्माण कंपन्यांचा सहभाग | कोल्हापूर

सविस्तर वृत्त

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राइव्ह–२०२६ उत्साहात संपन्न झाला. फार्मसी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शैक्षणिक संस्था आणि औषधनिर्माण उद्योग यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांना यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या.

या कॅम्पस ड्राइव्हला विविध फार्मसी महाविद्यालयांतील ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष मुलाखतींमध्ये सहभाग नोंदविला. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची एमबी केमिकल्स, ग्रुप फार्मास्युटिकल्स, ग्लेनमार्क, फायझर आणि झायडस फार्मा या आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग तसेच सेल्स अँड मार्केटिंग विभागासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गोवा व पुणे येथील कंपनीच्या प्रकल्पांमध्ये संधी मिळाल्या आहेत.

विद्यार्थ्यांना नामांकित औषधनिर्माण कंपन्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची, आपले तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता सादर करण्याची तसेच उज्ज्वल करिअरच्या संधींचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी या उपक्रमातून मिळाली.

मार्गदर्शन व सहकार्य

या यशस्वी उपक्रमासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या खालील मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले:

  • डॉ. संजय डी. पाटील (कुलपती, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ)
  • आमदार सतेज डी. पाटील (उपाध्यक्ष)
  • ऋतुराज पाटील (विश्वस्त)
  • पृथ्वीराज पाटील (विश्वस्त)
  • डॉ. राकेश शर्मा (कुलगुरू)
  • डॉ. व्ही. व्ही. भोसले (कुलसचिव)
  • डॉ. सी. एम. जंगमे (प्राचार्य, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी)
४३३
एकूण नोंदणीकृत विद्यार्थी
१६३
प्रत्यक्ष मुलाखती
१६
एकूण निवडलेले विद्यार्थी

सहभागी प्रमुख कंपन्या

एम. बी. केमिकल्स ग्रुप फार्मास्युटिकल ग्लेनमार्क इंडोको फायझर सेंचॉर एफडीसी झायडस फार्मा यशस्वी ग्रुप

नोकरीची ठिकाणे: पुणे, कोल्हापूर, बेंगळुरू आणि गोवा

कंपनी प्रतिनिधी सहभाग

  • ब्रजमोहन अग्रवाल
  • प्रदीप देसाई
  • साहिल पाटील
  • नंदकुमार पाटील
  • निलेश राऊत
  • विठ्ठल खराडे

कार्यक्रम नियोजन व समन्वय

सूत्रसंचालन: कु. वैष्णवी कौलगे आणि डॉ. सोनाली दिवटे

आभार प्रदर्शन: डॉ. अभिनंदन पाटील

नियोजन व समन्वय: आशुतोष पी. कांबळे (प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख)

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर

© २०२६ सर्व हक्क राखीव. | शैक्षणिक आणि उद्योग समन्वय उपक्रम

थोडे नवीन जरा जुने