१२ वी PCB नंतर आरोग्य क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी
कदमवाडी येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये मार्गदर्शन सेमिनार संपन्न
कोल्हापूर : १२ वी विज्ञान (PCB) नंतर विद्यार्थ्यांसाठी केवळ एमबीबीएस किंवा पारंपरिक वैद्यकीय शिक्षणापुरतेच पर्याय मर्यादित नसून, आरोग्य व संलग्न क्षेत्रात विविध अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले.
कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या "१२ वी PCB नंतरच्या करिअर संधी" या मार्गदर्शन सेमिनारात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी आणि पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शकांचे विचार
डॉ. अजित पाटील (संचालक, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट)
त्यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील करिअरच्या नव्या वाटांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी खालील क्षेत्रांतील देश-विदेशातील उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली:
"विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पर्यायांवर न थांबता स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन करिअरची दिशा निश्चित करावी."
डॉ. आर. के. शर्मा (कुलगुरू)
आरोग्य क्षेत्र हे भविष्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, आधुनिक सुविधा आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे.
प्रास्ताविक : डॉ. ७ी. व्ही. भोसले (कुलसचिव)
योग्य करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होऊन आत्मविश्वासाने भविष्यातील निर्णय घेण्यास मदत होते.
कॅम्पस व लॅबची पाहणी
सेमिनारनंतर विद्यार्थी व पालकांनी मेडिकल कॉलेज, रुग्णालय आणि कॅम्पसमधील विविध विभागांना भेट दिली. यावेळी त्यांनी सिम्युलेशन लॅब, आधुनिक प्रयोगशाळा आणि अध्यापन सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ
- डॉ. अमृत कुंवर रायजादे
प्राचार्य, फिजिओथेरपी कॉलेज - प्रा. मनिषा बिजापूरकर
उपप्राचार्या, नर्सिंग कॉलेज - डॉ. अभिनंदन पाटील
फार्मसी कॉलेज - रुधिर बारदेसकर
प्राचार्य, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी - प्रा. अभिजित मटकर
विभागप्रमुख, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट - डॉ. सी. डी. लोखंडे
अधिष्ठाता, सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी
सूत्रसंचालन आणि आभार
सूत्रसंचालन: प्रा. सुरज यादव आणि प्रा. मैथिली पाटील
आभार प्रदर्शन: डॉ. अजित पाटील
प्रमुख उपस्थिती
डॉ. पी. एस. पाटील (रिसर्च डायरेक्टर)
डॉ. ए. एम. गुरव
डॉ. उमाराणी जे.
संजय जाधव
जयदीप पाटील
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
कुलपती डॉ. संजय डी. पाटील
उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील
विश्वस्त ऋतुराज पाटील
विश्वस्त पृथ्वीराज पाटील

