विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ शिवाजी विद्यापीठात इंडिया आघाडीचे आंदोलन; निवेदन शिवरायांच्या चरणी अर्पण
कोल्हापूर : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने आज शिवाजी विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच संसदेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधूराचा वापर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले.
विद्यापीठ प्रशासनाचा निषेध
आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कुलगुरू डॉ. राजनीश कामत अनुपस्थित असल्याने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही निवेदन स्वीकारले नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधातही घोषणाबाजी केली.
अखेर आंदोलनकर्त्यांनी आपले निवेदन विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी अर्पण करत आंदोलनाची सांगता केली.
आंदोलनातील प्रमुख उपस्थिती
या आंदोलनात इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते:
