BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
🔴 BREAKING NEWS | कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार | सुरज साखरे जखमी | पोलिसांचा तपास सुरू
LIVE

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार;
सुरज साखरे जखमी,
खासगी सावकारकीच्या वादातून हल्ल्याची शक्यता

कोल्हापूर | प्रतिनिधी

मुख्य मुद्दे

  • नवी वाशी नाका परिसरात गोळीबार
  • भाजप कार्यकर्ते सुरज साखरे जखमी
  • उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
  • दोन अज्ञात हल्लेखोर फरार
  • पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासणी सुरू

कोल्हापूर शहरातील नवी वाशी नाका परिसरात गुरुवारी भाजप कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या सुरज साखरे यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सुरज साखरे हे जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी सुरज साखरे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, सुरज साखरे यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच खासगी सावकारकीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी अद्याप कोणत्याही कारणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

या गोळीबाराच्या घटनेमुळे नवी वाशी नाका परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. अधिक तपास सुरू आहे.

Breaking Update

सुरज साखरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, पंचनामा आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

थोडे नवीन जरा जुने