BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागाच्या सर्व सेवा महिनाभरात ऑनलाईन

शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागाच्या सर्व सेवा महिनाभरात ऑनलाईन
कोल्हापूर, दि. 26

शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागाच्या सर्व सेवा महिनाभरात ऑनलाईन

डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची घोषणा

शेतकऱ्यांचा जलसंपदा विभागाशी संबंधित येणारा प्रत्येक व्यवहार अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी विभागातील सर्व प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.


महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत मुख्य अभियंता (जलसंपदा) कृष्णा खोरे जलसंपदा विभागाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात पार पडला.

प्रमुख उपस्थिती

आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर महापौर रूपाराणी निकम राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आमदार चंद्रदीप नरके अशोक माने आमदार अमल महाडिक माजी आमदार संजय घाटगे म.कृ.खो.वि.म. कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ

यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील यांचे मार्गदर्शन व निर्णय

५६ हजार एकर जमीन जलसंपदा विभागाच्या नावावर

कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाची सुमारे 56 हजार एकर जमीन जलसंपदा विभागाच्या नावावर करण्यात आली असून यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

  • राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील पाणी विषमता कमी करण्यावर शासनाचा मुख्य भर राहणार आहे.
  • धरण परिसरातच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • कोल्हापूर ही सहकाराची भूमी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींनाही उजाळा दिला.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख मागण्या

काळमवाडी धरण

डाव्या व उजव्या कालव्यांच्या अस्तरीकरणास मंजुरी देऊन सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली.

फ्लड लाईन्स प्रश्न

कोल्हापूर शहरातील ब्ल्यू आणि रेड लाईनचा प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढावा.

अलमट्टी धरण वाद

सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची मदत घेण्याची सूचना केली.

खासदार धनंजय महाडिक यांचे मनोगत

कोल्हापूर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असला तरी अनेक लघु व सूक्ष्म सिंचन प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांमध्ये पाणी वापराबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढू नये यासाठी शासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी कोल्हापूरला विभागीय कार्यालय मंजूर केल्याबद्दल डॉ. विखे पाटील यांचे विशेष आभार मानले.

प्रास्ताविक व कार्यालयाची व्याप्ती

मुख्य अभियंता श्रीमती अलका अहिरराव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोल्हापूर येथे विभागीय कार्यालय सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाशी संबंधित प्रश्नांचे जलद निराकरण होणार आहे.

या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट ३ जिल्हे:
कोल्हापूर सांगली सातारा

उद्घाटन व सूत्रसंचालन

उद्घाटनापूर्वी डॉ. विखे पाटील यांनी सिंचन भवनातील नव्या विभागीय कार्यालयाची पाहणी केली आणि परिसर वृक्षारोपणही केले.

सूत्रसंचालन पंडित कंदले
आभार प्रदर्शन अधिक्षीक अभियंता चंद्रशेखर पाटोळे

या कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन | कोल्हापूर वृत्त

थोडे नवीन जरा जुने