डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा प्लेसमेंटमध्ये नवा विक्रम; ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड
कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्था) ने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्लेसमेंटचा नवा इतिहास रचत ६३८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवून दिली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि प्रभावी प्लेसमेंट व्यवस्थेच्या जोरावर संस्थेने यंदा विक्रमी यश संपादन केले आहे.
आकर्षक पगाराच्या ऑफर्स
यंदाच्या प्लेसमेंटमध्ये सरासरी वार्षिक ६.३ लाख रुपयांचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले असून, २०० हून अधिक विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक पगाराच्या ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत.
प्रमुख सहभागी कंपन्या
या यशाबद्दल निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
"गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सक्षम प्लेसमेंट सेल यामुळे यंदाही विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या. भविष्यातही विद्यार्थ्यांना अधिकाधिक जागतिक दर्जाच्या संधी मिळवून देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे."
"नुकतेच महाविद्याराला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार एनबीए मानांकन तसेच शिवाजी विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली असून, भविष्यात आणखी मोठ्या कंपन्या आणि उच्च पॅकेजच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील."
"प्लेसमेंटमधील हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सक्षम शैक्षणिक व्यवस्थेचे फलित असल्याचे सांगत रोजगारक्षम शिक्षणाला भविष्यातही सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल."
"विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, कोडिंग प्रॅक्टिस, करिअर काउन्सेलिंग, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योग–महाविद्यालय सहकार्य, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन आणि नवोपक्रमाला दिलेले प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याची मोठी संधी मिळत आहे."
या विक्रमी यशामध्ये अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सर्व विभागप्रमुख, प्लेसमेंट समन्वयक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे संस्थेने नमूद केले.
