NEWS KATTAA
ताज्या घडामोडी | Breaking News
भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांचं अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये रूपांतर
वर्कशॉप कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीला महापौर-आयुक्तांकडून शाबासकी
"टाकाऊतून टिकाऊ" या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागाने एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी २०१६ साली घेतलेल्या आणि सध्या भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांना वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कौशल्याने नवसंजीवनी दिली.
या गाड्यांचे रूपांतर आता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी उपयुक्त अशा ट्रकमध्ये करण्यात आले असून, सहा दिवसांच्या विक्रमी वेळेत त्या रस्त्यावर कार्यरत झाल्या आहेत.
विशेष म्हणजे या संकल्पनेचे जनक स्वतः आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड हेच आहेत. आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी कार्यशाळा विभागास भेट दिली त्यावेळी या गाडया भंगारात न घालता याचा अतिक्रमणासाठी वापर करता येईल का याची कल्पना मांडली.
