BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

शहरातील फुटपाथ, रस्ते तसेच श्री महालक्ष्मी मंदिर आणि रंकाळा परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करण्याचे आदेश.

अनधिकृत अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करा - आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
🔴 BREAKING NEWS | कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचा अतिक्रमणांवर मोठा निर्णय
BREAKING NEWS

अनधिकृत अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करा - आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागप्रमुखांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

📍 कोल्हापूर | 🗓️ आजची बातमी | 🏛️ महानगरपालिका प्रशासन
शहरातील फुटपाथ, रस्ते तसेच श्री महालक्ष्मी मंदिर आणि रंकाळा परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करण्याचे आदेश.

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात आज सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी शहरातील पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्याने तसेच विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत वाहतूक विभागाच्या पत्रानुसार शहरातील फुटपाथ, रस्ते तसेच श्री महालक्ष्मी मंदिररंकाळा परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर विभागीय कार्यालय स्तरावर सातत्याने कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

प्रत्येक विभागीय कार्यालयाला स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन वाहन उपलब्ध करून देण्यात येत असून, ज्या ठिकाणी यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे तेथे पुन्हा विनापरवाना अतिक्रमण आढळल्यास तत्काळ कारवाई करून संबंधित साहित्य जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

फेरीवाला परवाना (कार्ड) नसलेल्या तसेच मंजूर ठिकाणाऐवजी अन्यत्र व्यवसाय करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्यांच्या नावावर परवाना आहे, त्याच व्यक्तीने व्यवसाय करणे आवश्यक असून अन्य व्यक्ती व्यवसाय करताना आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य महासभेच्या धोरणानुसार पुन्हा परत देण्यात येणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

विभागीय कार्यालयांमध्ये बदली करण्यात आलेले परंतु अद्याप हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याचे आदेश देत अशा कर्मचाऱ्यांवर ‘विना वेतन’ कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

तसेच सर्व पाणीमीटर रीडर यांच्या बदल्यांचे नियोजन करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

महापालिकेच्या स्वनिधीमधून आयुक्तांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही बिल अथवा अदाबाकी करू नये अशा सक्त सूचना वित्त अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच चारही विभागीय कार्यालयांना स्वतंत्र बूम उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित बूम हे सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राहतील. त्यांच्या नियोजनाव्यतिरिक्त परस्पर कोणीही बूम हलविल्यास अथवा वापरल्यास संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, करनिर्धाकर संग्राहक सुधाकर चल्लावाड, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, सहा. अभियंता नारायण पुजारी, कार्यशाळा प्रमुख संजय भोसले, रवका अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, परवाना अधिक्षक अशोक यादव, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील, अमित दळवी, अतिक्रमण अधिक्षक प्रफुल्ल कांबळे उपस्थित होते.

News Kattaa

मराठी न्यूज पोर्टल | ताज्या बातम्या सर्वात आधी

थोडे नवीन जरा जुने