BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

स्नेहल वेल्हाळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; माण-करंजेफण आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांचा प्रश्न अखेर मार्गी!

आरोग्य केंद्रांवरील डॉक्टर नियुक्तीचा प्रश्न मार्गी
ब्रेकिंग न्यूज

आरोग्य केंद्रांवरील डॉक्टर नियुक्तीचा प्रश्न मार्गी; नागरिकांमध्ये समाधान

📍 आंबार्डे, प्रतिनिधी :

आंबार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील माण व करंजेफण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने परिसरातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या समस्येची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण व क्रीडा समिती सदस्य सौ. स्नेहल वेल्हाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती.

या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून माण प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. पी. एस. पवारडॉ. गोले, तर करंजेफण प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. बोरकरडॉ. महतो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम, तत्पर व दर्जेदार होण्यास मदत होणार असून नागरिकांना उपचारासाठी होणारा त्रास कमी होणार आहे.

या निर्णयाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. आरोग्य सेवेत आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचे सौ. स्नेहल वेल्हाळ यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने