BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

झालेली विधानसभा तुम्ही कुणाच्या जीवावर लढला.. तुम्ही किती चोख आहात हे जाहीर करा.

राजकीय पलटवार : ऋतुराज क्षीरसागर वि. राजेश लाटकर

"झालेली विधानसभा तुम्ही कुणाच्या जीवावर लढला.. तुम्ही किती चोख आहात हे जाहीर करा.?"

नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा राजेश लाटकर यांच्यावर पलटवार
कोल्हापूर | दि. २८

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विकास कामांचा वाढता आलेख पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभूत करता आले नाही, महापालिकेतील सत्ता गेल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. याचाच प्रत्यय कॉंग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आला.

वास्तविक महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विरोधात बंडखोरी केली कि नाही? राजे घराण्यासोबत गद्दारी केली कि नाही? कॉंग्रेसच्याच उमेदवाराविरोधात फॉर्म भरला कि नाही? त्यासाठी कुणाकडून किती पैसे घेतले? विधानसभेची निवडणूक ते कुणाच्या जीवावर लढले, हे आधी जाहीर करावे आणि मगच त्यांनी शहराचे लोकप्रिय आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करावी, असा पलटवार नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, जयप्रभा स्टुडीओची जागा खाजगी मालकीची आहे. पण, जनभावना आणि कलाकारांच्या भावनांचा आदर ठेवून सदर जागा शासकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्नशील आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळीतग्रस्त झाल्यानंतर तात्काळ आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेवून मा. मुख्यमंत्री महोदयांना याठिकाणी पाचारण केले आणि रु. २५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला.

नाट्यगृहाचे काम होत असताना रंगकर्मी आणि कलाकारांच्या सूचना विचारात घेवून दर्जेदार कामास प्राधान्य दिले जात आहे. या कामाची सुरवात होताना सर्व प्रक्रिया प्रशासनामार्फत कायदेशीरबाबी राबवून केल्या गेल्या. पण, एडीटेड व्हिडीओचा संबध या कामाशी जोडून त्यावरून आमदार राजेश क्षीरसागर यांना गोवण्याचा बालिश प्रयत्न जनताच हाणून पाडेल. नगरसेवक राजेश लाटकर हे काय धुतल्या तांदळाचे नाहीत. कावळा नाका येथील जागेत गाळा मिळावा, यासाठी ते कोणाच्या हात धुवून मागे लागले होते? हेही जनतेसमोर जाहीर करावे, असे खुले आवाहन नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.

चौकट –
विकासकामाचे टेंडर प्रशासन काढते ते काय आमदारांच्या हातात आहे काय? स्थायी समिती सभापती पद भोगलेले राजेश लाटकर अज्ञानी आहेत काय? : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर

लोकप्रतिनिधींचे काम निधी आणायचे असते. ठेकेदार, कन्सल्टंट नेमायची प्रक्रिया प्रशासनामार्फत केली जाते. जर अधिकारी, ठेकेदार विकासकामाबाबत पारदर्शीपणा ठेवत नसतील तर त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून वचक ठेवणे गरजेचेच आहे आणि तेच आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून केले जात आहे. परंतु, प्रसिद्धीपोटी टीका करायची हाच एकमेव उद्योग विरोधकांकडून पहायला मिळत आहे.

परंतु, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असो वा कावळा नाका येथील जागा सर्व प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार पेपर जाहिरात प्रसिद्ध करून निविदा प्रक्रियेनुसार झाली आहे. यांचे सर्व नियंत्रण प्रशासकीय विभागांकडे होते. विकास कामाचे टेंडर प्रशासन काढते ते काय आमदारांच्या हातात आहे काय? इतके न समजण्याएवढे राजेश लाटकर अज्ञानी आहेत काय? असा खोचक टोलाही नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी लगावला.

थोडे नवीन जरा जुने