BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

व्हिडिओ एडिट करून बदनामी केल्याचा आरोप; ५ कोटींच्या दाव्याचा इशारा देत ऋतुराज क्षीरसागर आक्रमक

NK News Marathi
कोल्हापूर

व्हिडिओ एडिट करून बदनामी केल्याचा आरोप; ५ कोटींच्या दाव्याचा इशारा देत ऋतुराज क्षीरसागर आक्रमक

कोल्हापूर : सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित व्हिडिओप्रकरणी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी पत्रकार निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करत हा व्हिडिओ एडिट करून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आपली बदनामी करण्यात आल्याचे सांगत संबंधितांविरोधात ५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवेदनात रवि इंगवले यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागण्याचे प्रकार केल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या ऑडिओ-व्हिडिओ क्लिपमधील अपशब्दांद्वारे आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणामागे काही राजकीय शक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त करत, विशेषतः आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे बोट दाखविण्यात आले आहे.

नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, संबंधित व्हिडिओचा आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीनेही आपली भूमिका जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात हा व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत, कोल्हापूर शहरातील मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखवत आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले.

दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर हे सध्या विधिमंडळ अधिवेशनानिमित्त मुंबई येथे असून, या प्रकरणासंदर्भात ते २८ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने