BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापूरच्या शिक्षण अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक

Latest News - कोल्हापूर
ब्रेकिंग न्यूज

कोल्हापूरच्या शिक्षण अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी)
सोमवार, १ जून २०२६

कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी डी. सी. कुंभार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी शिक्षण समितीच्या कार्यालयाबाहेरच करण्यात आली.

एका शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून हा सापळा रचण्यात आला होता. जिल्हा बदलीहून आलेल्या शिक्षकाला कोल्हापूर महापालिका शाळेत नियुक्ती देण्यासाठी कुंभार यांनी लाच मागितली होती. लाच घेताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कुंभार हे मूळचे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी असून, त्यांच्याकडे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचा प्रशासनाधिकारी म्हणून प्रभारी कार्यभार होता. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

थोडे नवीन जरा जुने