BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

एकमेकांना वाचवताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; पंढरपूर तालुका शोकसागरात

पंढरपूर तालुका शोकसागरात - दुर्दैवी घटना
ब्रेकिंग न्यूज
मंगळवार | गुरसाळे (पंढरपूर)

एकमेकांना वाचवताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; पंढरपूर तालुका शोकसागरात


पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे शिवारात मंगळвати घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन जिवलग शाळकरी मित्रांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

मृत मुलांची नावे:
  • १) विघ्नेश सज्जन शेजाळ (वय १३ वर्षे)
  • २) अनंत महादेव नलवडे (वय १४ वर्षे, रा. गुरसाळे)

हे दोघे मित्र सकाळी बालूमामांच्या मेंढ्यांची देखभाल करण्यासाठी शिवारात गेले होते. दुपारच्या सुमारास ते जवळील विहिरीकडे गेले.

दोघांपैकी एकजण विहिरीत उतरला असता तो पाण्यात बुडू लागला.

त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्रानेही विहिरीत उडी घेतली.

मात्र दुर्दैवाने दोघांनाही बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या हृदयद्रावक घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात असून खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन निष्पाप मुलांचा झालेला मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला आहे.

थोडे नवीन जरा जुने