BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

करवीर नगरीत अमित शहा यांचे आज जल्लोषात स्वागत; आज विविध विकासकामांचा शुभारंभ

अमित शहा करवीर दौरा
🔴 BREAKING NEWS

करवीर नगरीत अमित शहा यांचे आज जल्लोषात स्वागत; आज विविध विकासकामांचा शुभारंभ

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे करवीर नगरीत आगमन होताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कोल्हापूर विमानतळावर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

अमित शहा आज श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ करणार असून मंदिर परिसराच्या विकास आराखड्याची पाहणीही करणार आहेत. त्यानंतर पोलीस परेड ग्राउंड वरील जाहीर सभेत ते नागरिकांना संबोधित करणार आहेत.

दुपारनंतर इचलकरंजी येथे जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात सहभाग आणि शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन असा त्यांचा कार्यक्रम आहे. या दौऱ्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

थोडे नवीन जरा जुने