BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

WIFA आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा: कोल्हापूरचा पुण्यावर शानदार विजय;

WIFA फुटबॉल स्पर्धा निकाल

WIFA आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा: कोल्हापूरचा पुण्यावर शानदार विजय

कोल्हापूर | प्रतिनिधी

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) तर्फे आयोजित आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने पुणे संघाचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबईने नागपूरचा १-० असा पराभव करून यश संपादन केले.

सामन्याचा थरार:

अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच कोल्हापूरच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

  • ३५ मि: हर्ष जरग याला अडवल्यामुळे पेनल्टी - संकेत अनिल साळोखे गोल (१-०)
  • ४१ मि: पुन्हा संकेत साळोखे याचा दुसरा गोल (२-०)
  • ५२ मि: करण बंदरे यांचा शानदार गोल
  • ६४ मि: हर्ष जरग याचा गोल
  • ८८ मि: ओमकार मोरेच्या पासवर संकेत साळोखे (५-०)
कोल्हापूर विजयी संघ:

संकेत जरग, रोहित पोवार, ओमकार मोरे, प्रभू पोवार, विशाल पाटील, अमर गवळी (गोलकीपर)

पुणे संघ:

प्रसाद नाईक, सुमित काटे, सतीश हवालदार, जॉर्डन फर्नांडिस, प्रतीक साबळे

🎁 बक्षिसांचा वर्षाव 🎁

खासदार शाहू महाराज यांच्याकडून प्रत्येक खेळाडूस ११,००० रुपये बक्षीस.

एकूण २,४२,००० रुपये!

विशेष सत्कार: डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर पथकाचा गौरव करण्यात आला.

उपस्थित मान्यवर: मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, किरण चौगले (WIFA सचिव), साजिद अन्सारी (सहसचिव), माणकीराव मंडलिक, प्रा. अमर सासणे, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, भाऊ घोडके.
निवेदक: विजय साळोखे.

उद्याचा सामना - महापौर चषक

पीटीएम (PTM) विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब

© २०२६ डिजिटल Newss कट्टा

थोडे नवीन जरा जुने