महापौर चषक फुटबॉल स्पर्धा
उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम व खंडोबा तालीम मंडळ पुढील फेरीत!
दुपारचे सत्र: खंडोबा तालीम मंडळ वि. फुलेवाडी क्रीडा मंडळ
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आज दुपारच्या सत्रातील दुसरा सामना फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. दोन्ही संघाच्या संधीही वाया गेल्या. मात्र दोन्ही संघाना गोल करण्यात यश आले नाही. मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला.
• ४४ वे मिनिट: ऋतुराज संकपाळ (पास: आदित्य लायकर)
• अतिरिक्त वेळ: विनायक पाटील
उत्तरार्धात गोल करण्यासाठी उतरलेल्या दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ करण्यात आला. फुलेवाडी संघाकडून खंडोबाच्या डी मध्ये जोरदार चढाया करण्यात आल्या मात्र खंडोबाच्या बचावफळीने त्या परतवून लावल्या. अखेर खंडोबा तालीम मंडळाने २ विरुद्ध ० गोल ने विजय मिळवला.
संयुक्त जुना बुधवार पेठ वि. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम
अटीतटीचा झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत निकाल न लागल्याने सामना ट्रायब्रेकरवर गेला. यामध्ये उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठेचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.
🛑 उद्याच्या सामन्यांना सुट्टी!
उद्या आंतरजिल्हा स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे:
कोल्हापूर विरुद्ध पुणे
वेळ: दुपारी ४:०० वाजता
