SIR प्रक्रियेवर काँग्रेसची बैठक; राज्यव्यापी जनजागृती मोहिमेची घोषणा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी मुंबईतील टिळक भवन येथे पार पडली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या SIR मोहिमेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान मतदार यादीतील नावांबाबत उद्भवू शकणाऱ्या अडचणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट राहावे आणि कोणत्याही मतदाराला अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी जनजागृती वाढविण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.
“उठा, SIR जागे व्हा! लोकशाही वाचवा”
या राज्यव्यापी जनजागृती मोहिमेद्वारे मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करून लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मोहिमेचे नेतृत्व व समन्वय
या मोहिमेच्या समन्वयाची जबाबदारी विधान परिषद गटनेते सतेज (बंटी) पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर माहितीपर संवाद व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस उपस्थित ज्येष्ठ नेते व पदाधिकारी:
* यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
