BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज

महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर प्रात्यक्षिके
आपत्ती व्यवस्थापन सज्जता

महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके

आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज

कोल्हापूर | ता. २३ विशेष वृत्त

संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आज पावसाळ्यापुर्वी अग्निशमन विभागाकडुन अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर करण्यात आली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या समोर सकाळी ८ वाजलेपासून मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे यांनी दाखविले.

आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन व मार्गदर्शन:

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापालिकेना आपत्ती व्यवस्थान यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. मागील वर्षी योग्य नियोजन केल्यामुळे कोणतीही जिवीत व वित्तहानी झालेली नव्हती त्याच अनुषंगाने याही वर्षी महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थानाबाबत योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात यावी. सध्या पावसाळयापुर्वी शहरातील नाल्यांची सफाईचे काम सुरु आहे. तसेच रेस्क्यूचे आज प्रात्यक्षिक आज करण्यात आले. सध्या महापालिकेकडे ३ लहान बोट, १४ रेस्क्यू बोट असून, या सर्वांचे प्रात्यक्षिक आज दाखविण्यात आले. कोल्हापूरमध्ये सन २०१९ व २०२१ ला जी पूरजन्य परिस्थीती झाली होती त्याचा अनुभव सर्वच कोल्हापूर वासियांना आहे. याच्यापासून आपण कशा पध्दतीने अनुभव घेऊ शकतो याचेच एक प्रात्यक्षिक आज झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर महानगरपालिकेडे अत्याधुनिक साहित्य आपल्याकडे आहे. नागरीकांनी महापालिकेने वेळेवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये महापालिकेने केलेल्या आवाहनाचे पालन करावे."

लाईव्ह प्रात्यक्षिके व अत्याधुनिक यंत्रसामुग्री

नदीमध्ये प्रात्यक्षिका दरम्यान अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॅकेट, फायबर इनर व नव्याने दाखल झालेले रिमोट कंट्रोल लाईफ बॉयच्या सहाय्याने बुडणाऱ्या व्यक्तीला सुखरुप कसे वाचवले जाते याचेही लाईव्ह प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.

प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेली अत्याधुनिक साधने:
कटर स्प्रेडर स्लॉप कटर बी.ए.सेट हायड्रोलिक जॅक हायड्रॉलिक कटर कॉम्प्रेसर लिफ्टींग बॅग लाईफ लाईन लाँचर व्हिक्टम लोकेशन कॅमेरा थर्मल इमेजिंग कॅमेरा क्विक रिस्पॉन्स व्हेईकल

यावेळी ऑल इंडिया इन्सीट्युट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट फायर कॉलेज विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाकडून आपत्ती कालीन कालवधीमध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

उपस्थित अधिकारी, जवान व स्वयंसेवक:

अति-आयुक्त रविकांत आडसूळ मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रनभिसे स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला कांता बांदेकर तांडेल किसन पवार तानाजी वडर विजय सुतार प्रमोद मोरे संग्राम मोरे गिरीष गवळी अभय कोळी नितेश शिंगारे सौरभ पाटील रोहन लगडे बावडा रेस्क्यु फोर्सचे स्वयंसेवक अग्निशमन विभागाकडील जवान
थोडे नवीन जरा जुने