BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणी

वर्कशॉप विभाग पाहणी - कोल्हापूर महापालिका
महत्त्वाची घडामोड

वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर | सोमवार, २५ मे

कोल्हापूर, ता. २५ : महापालिकेच्या वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज सायंकाळी पाहणी केली. यावेळी वर्कशॉपमधील जुना स्क्रॅप तातडीने काढून त्याचा लिलाव करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

उपस्थित अधिकारी व मान्यवर:
सहायक आयुक्त विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, अभय तेंडुलकर, राजू पागर, महेश महाडीक व सुधीर राणे उपस्थित होते.

पाहणी व मुख्य निर्देश:

📋 कामकाजाचा आढावा

स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी वर्कशॉपची संपूर्ण पाहणी करून विविध विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच वर्कशॉपमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

🚚 स्वतंत्र यंत्रणा व विकासकामांना गती

प्रत्येक विभागीय कार्यालयासाठी स्वतंत्र टँकर, जेसीबी, डंपर व रोलर उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. त्यामुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

💰 वाहनांचा लिलाव व नवीन साहित्य खरेदी

१५ वर्षांची मुदत पूर्ण झालेल्या २७ वाहनांचा शासनाच्या अधिकृत कंपनीमार्फत लिलाव करावा. महापालिकेतील सर्व विभागांमधील स्क्रॅप काढण्याचे नियोजन करून, या प्रक्रियेतून महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नातून नवीन वाहने व वर्कशॉपला आवश्यक ते साहित्य खरेदी करण्यात यावे अशा सूचना दिल्या.

थोडे नवीन जरा जुने