डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्याची स्नेइडर इलेक्ट्रिकमध्ये निवड - यश मिळवणारा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी
येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षात शिकणारा ओंकार चोडणकर या विद्यार्थ्यांची स्नेइडर इलेक्ट्रिक बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे ही निवड झाली आहे.
५,०००+
देशभरातून सहभागी विद्यार्थी
१२
३ राज्यांमधून अंतिम निवड
१
पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव (ओंकार)
निवड प्रक्रियेचे ४ कठीण टप्पे
ग्रुप डिस्कशन
टेक्निकल राउंड
मॅनेजेरिअल राउंड
एचआर राउंड
उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर ओंकारने हे यश संपादन केले.
मार्गदर्शकांचे मनोगत
डॉ. अभिजीत माने (कॅम्पस संचालक) :
"विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या प्लेसमेंटवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे हे अत्यंत महत्वाचे आहे."
डॉ. सुरेश माने (प्राचार्य) :
"नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये प्रात्याक्षिकावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते याचा उपयोग विद्यार्थ्यांची निवड होण्यास उपयुक्त ठरते."
यांचे लाभले मार्गदर्शन:
कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, विभागप्रमुख डॉ. विद्या अब्दुलपूरकर, टीपीओ प्रिती भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
ओंकारचे अभिनंदन व शुभेच्छा!
ओंकारच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील आणि देवश्री पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
