BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

घरफाळा वसुली वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

घरफाळा वसुली आढावा बैठक - कोल्हापूर महापालिका
महत्त्वाची बैठक

घरफाळा वसुली वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

कोल्हापूर | सोमवार, २५ मे २०२६

कोल्हापूर, ता. २५ : महापालिकेच्या घरफाळा विभागाने चालू आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तत्काळ वसुली वाढविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. घरफाळा विभागाच्या वसुली कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रारंभी कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी स्लाईड शोद्वारे घरफाळा विभागाची माहिती दिली. यामध्ये चालू मागणीवरील ६ टक्के सवलत योजनेतून आजअखेर ९ कोटी रुपयांची वसुली झाली असून, ३० जुलै २०२६ अखेर ३० कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
आजअखेर वसुली

९ कोटी

३० जुलैचे उद्दिष्ट

३० कोटी

एकूण थकबाकी

७३.७७ कोटी

यावर्षीचे लक्ष्य

२०-२५ कोटी


आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे महत्त्वाचे निर्देश:

🎖️ कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन

घरफाळा विभागातील चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कमी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आयुक्त स्वतः आढावा घेणार आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याने नवीन मिळकतींचा शोध घेऊन उत्पन्न वाढवावे.

📢 ६% सवलत व जनजागृती

६ टक्के सवलतीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश दिले. थकबाकीमधील दुबार नोंदींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

📞 विशेष थकबाकी व पाठपुरावा

न्यायप्रविष्ठ प्रकरणे, शासकीय थकबाकी तसेच मोबाईल टॉवर थकबाकीबाबत अधिक्षक, कर निर्धारक व संग्राहक आणि सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ पाठपुरावा करावा. ज्या शासकीय इमारतींना अद्याप घरफाळा आकारलेला नाही, अशा सर्व मिळकतींना कर आकारणी करावी.

🏢 'टॉप १०' यादी व मिळकती सील

मोठ्या शासकीय व व्यावसायिक थकबाकीदारांची ‘टॉप १०’ यादी तयार करून वसुलीसाठी विशेष मोहीम राबवावी. नव्याने शोधलेल्या ६ हजार मिळकतींना अंतिम ७ दिवसांची नोटीस देऊन कर आकारणी करावी आणि थकीत व्यावसायिक मिळकती सील कराव्यात.

🤝 बैठकीस उपस्थित अधिकारी:
सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, अज्वला शिंदे, जयंत जावडेकर, विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, अधिक्षक अशोक यादव, दत्तप्रसाद माजगांवकर, अर्चना प्रभावळे तसेच वसुली लिपीक उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने