कसबा बावडा परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई; अनधिकृत साहित्य कायमस्वरूपी जप्त
कोल्हापूर, ता. २९ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.४ (छ.ताराराणी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज कसबा बावडा मेनरोड ते प्रिन्स शिवाजी विद्यालय या परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य:
महानगरपालिकेच्या ठराव क्र. ८३, दि. १८ मे २०२६ नुसार जप्त अनधिकृत साहित्य व्यवसायधारकांना परत न देण्याच्या निर्णयानुसार हे साहित्य कायमस्वरूपी जप्त केले आहे.
सदरची कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त डॉ.विजय पाटील व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मोहिमेत सहभागी अधिकारी व कर्मचारी पथक:
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे जाहीर आवाहन:
संबंधित व्यवसायधारकांनी व नागरिकांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा यापुढील कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही.
