BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कॉक्रोच जनता पार्टीला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात घोषणा

राजकीय घडामोडी | कॉक्रोच जनता पार्टीला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा पाठिंबा
जाहीर पाठिंबा कोल्हापूर

कॉक्रोच जनता पार्टीला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात घोषणा


कोल्हापूर : देशात वाढत असलेल्या भ्रष्टाचार, अन्याय आणि संविधानविरोधी कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला महाराष्ट्र बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सामाजिक चळवळींमध्ये तरुणांचा सहभाग कमी असल्याची टीका सातत्याने केली जात होती. अनेक तरुणांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवण्यात आले, त्यांचा अपमान करण्यात आला. अशा परिस्थितीत अभिजीत दिपके या तरुणाने पुढे येत ऑनलाईन माध्यमातून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची स्थापना केली. देशभरातील जवळपास २० मिलियन तरुणांनी या चळवळीला पाठिंबा दिला असून, हा भारतीय राजकारणातील एक वेगळा आणि ऐतिहासिक प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.

चळवळीतील तरुण सहभाग: जवळपास २० मिलियन
स्थापना माध्यम: ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म

या प्रमुख मुद्द्यांवरून दिला पाठिंबा:

  • देशातील विविध विभागांमध्ये वाढलेला भ्रष्टाचार.
  • संविधानाच्या अपेक्षेप्रमाणे कारभार न होणे.
  • निवृत्त न्यायाधीशांना राज्यसभेवर पाठविण्यासारख्या घडामोडींविरोधात आवाज.

सामान्य तरुणांच्या भावना आणि प्रश्न मांडणाऱ्या या चळवळीला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पत्रकार परिषदेला उपस्थित पदाधिकारी:

डॉ. अनिल माने (अध्यक्ष) अरविंद सोनटक्के (उपाध्यक्ष) प्रमोद हुपरीकर राजेंद्र कांबळे सुरेश जत्राटकर प्रकाश हुलस्वार सुहास निर्मळे युवराज राजवाडे
राजकीय युती आणि घडामोडी
मे २०२६
थोडे नवीन जरा जुने