BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

इचलकरंजीत आयपीएल बेटिंग रॅकेटवर मोठी कारवाई; भाजप नगरसेवकासह ९ जण अटकेत

इचलकरंजी क्राईम न्यूज | आयपीएल बेटिंग रॅकेटवर मोठी कारवाई
मोठी कारवाई इचलकरंजी

इचलकरंजीत आयपीएल बेटिंग रॅकेटवर मोठी कारवाई; भाजप नगरसेवकासह ९ जण अटकेत


इचलकरंजी : शहरातील आयपीएल बेटिंग रॅकेटवर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत भाजपचे नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवार यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम आणि तीन आलिशान चारचाकी वाहनांसह तब्बल ५९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आजवरची ही मोठी कारवाई मानली जात असून आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी अमेय विलास बडवे, गणेश प्रकाश पाटील, अभिजित विलास बडवे, उत्तमसिंग बग्गा, याकुब मुजावर आणि रिषभ पाटील यांच्याविरोधात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत ही कारवाई केली. अनेक दिवसांपासून पोलिसांचे या बेटिंग रॅकेटकडे लक्ष होते. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

मोबाईल आणि लॅपटॉप
रोख रक्कम
३ आलिशान चारचाकी वाहने
एकूण किंमत: तब्बल ५९ लाख रुपये

दरम्यान तपासादरम्यान आमदार राहुल आवाडे यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवार, सचिन हलकापूरे आणि मनीष सागावकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे.

अटकेतील संशयित आरोपी:

नितेश उर्फ गोट्या पवार (भाजप नगरसेवक) अमेय विलास Bडवे गणेश प्रकाश पाटील अभिजित विलास बडवे उत्तमसिंग बग्गा याकुब मुजावर रिषभ पाटील सचिन हलकापूरे मनीष सागावकर

नगरसेवक नितेश पवार यांना अटक झाल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्ते आणि काही नगरसेवकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिति नियंत्रणात ठेवत तपास सुरू ठेवला.

या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून आणखी काही बाहेरील गावातील व्यक्ती आणि बडे मासे तपासात समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

विशेष पोलीस पथक कारवाई
अपडेटेड २०२६
थोडे नवीन जरा जुने