"ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत"
- निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या बाबतीतील आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सूचना दिली की, जखमी कामगारांच्या बाबतीत साखर कारखान्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. काही प्रस्तावांवर सिव्हिल सर्जन यांचा अभिप्राय घेणे आवश्यक असून, कामात पारदर्शकता आणि अचूकता राखण्याचे आदेश त्यांनी दिले.
बैठकीच्या प्रारंभी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी सानुग्रह अनुदानाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तावांची विस्तृत माहिती सादर केली.
बैठकीस उपस्थित अधिकारी:
- • डॉ. रेश्मा पाटील
- • डॉ. सुशांत रेवडेकर (जिल्हा साथरोग अधिकारी)
- • महेंद्र कांबळे
- • बी. बी. पाटील
व समाजकल्याण विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी.
