BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कचरा व्यवस्थापन ही सामूहिक जबाबदारी; विमानतळ सुरक्षिततेशी तडजोड नको

विमानतळ परिसर कचरा व्यवस्थापन - बातमी
कोल्हापूर | १५ मे २०२६

"कचरा व्यवस्थापन ही सामूहिक जबाबदारी; विमानतळ सुरक्षिततेशी तडजोड नको"

- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर विमानतळ परिघामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सुरू असलेली विविध बांधकामे विमानतळाच्या सुरक्षिततेची मानके पूर्ण करण्यासाठी अडचणीची ठरू शकतात. ही बाब टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून प्रत्येक कुटुंबाने ती पार पाडावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केली.

महत्त्वाची सूचना: विमानतळ क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या किंवा भविष्यात होणाऱ्या बांधकामांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण, मनपा आणि संबंधित ग्रामपंचायतींचा 'ना हरकत दाखला' घेणे आता अनिवार्य आहे.

विमानतळ परिघामध्ये करावयाचे बांधकाम नियमितीकरण व घनकचरा विल्हेवाट याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी सूचना दिली की, विमानतळ परिसरात असलेली अनाधिकृत बांधकामे संबंधित ग्रामपंचायतींनी त्वरित ओळखून (Identify) त्यावर कार्यवाही करावी.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर:
  • • डॉ. जास्मिन (सीईओ, जिल्हा परिषद)
  • • गजानन गुरव (निवासी उपजिल्हाधिकारी)
  • • श्रीमती मोसमी बर्डे-चौगुले (प्रांत अधिकारी)
  • • स्वप्निल पवार (तहसीलदार)
  • • अनिल शिंदे (विमानतळ संचालक)
  • • दिलीप कदम (नागरी विकास प्राधिकरण)
  • • संग्राम पाटील (जिल्हा परिषद सदस्य)
  • • उदय गायकवाड

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोसमी बर्डे यांनी केले, तर विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सुरक्षिततेच्या नियमावलीबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी आणि क्रेडाईचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने