BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन

शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर - फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम
फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन

शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर

शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे ‘थ्री डी प्रिंटिंग, ॲडीटिव मॅन्युफॅक्चरिंग अँड सॉलिड वर्क्स’ या विषयावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते आणि शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. नितीन सोनजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पॉलिटेक्निकमधील ३० प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

डॉ. महादेव नरके यांचे प्रतिपादन:

कार्यक्रमप्रसंगी बोलताना डॉ. नरके यांनी शिक्षकांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला अपडेट ठेवावे, असे प्रकर्षाने नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नितीन सोनजे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शासकीय तंत्रनिकेतन मधील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांना नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. बदलत्या औद्योगिक गरजा ओळखून हे सेंटर आगामी काळात तंत्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाची सुरुवात एक्सलन्स सेंटरचे समन्वयक डॉ. रणजीत सावंत यांनी केली, त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:

या सोहळ्याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय गर्गे, डॉ. दिग्विजय रावळ, प्रा. शशांक मांडरे, डॉ. महांतेष चौधरी आणि सचिन पतंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

© २०२६ | शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर. सर्व हक्क सुरक्षित.

थोडे नवीन जरा जुने