BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

थरारक लढतीत वेताळ तालीम मंडळाचा अंतिम फेरीत प्रवेश

महापौर चषक फुटबॉल बातमी

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा

थरारक लढतीत वेताळ तालीम मंडळाचा अंतिम फेरीत प्रवेश!

PTM चे आव्हान सडनडेथमध्ये संपुष्टात

छत्रपती शाहू स्टेडियम, कोल्हापूर

PTM (A) 0 (7) Vs 0 (8) वेताळ तालीम

कोल्हापुरातील मानाच्या 'महापौर चषक' फुटबॉल स्पर्धेत आज सडनडेथपर्यंत खेचल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात वेताळ तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळ 'अ' (PTM) संघावर निसटता विजय मिळवला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला होता. मध्यंतरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोल करण्यासाठी अनेक चढाया केल्या, मात्र दोन्ही संघांच्या भक्कम बचावामुळे आणि गोल करण्याच्या संधी हुकल्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला (HT 0-0). उत्तरार्धातही खेळाचा दर्जा उंचावलेला पाहायला मिळाला, पण निर्धारित वेळेत एकाही संघाला गोल नोंदवता आला नाही (FT 0-0).

टायब्रेकर (PTM 4 | वेताळ 4)

PTM गोल: प्रथमेश हेरेकर, अरबाज पेंढारी, रोहित पोवार, प्रतीक बदामे.

वेताळ गोल: शोएब बागवान, जय कामत, प्रणव कणसे, रेहान मुजावर.

सडनडेथ निकाल

वेताळ तालीम मंडळाकडून विशाल कुरणे, आकाश मोरे, मणिकंदन मॉर्गन आणि ऋतुराज सूर्यवंशी यांनी अचूक गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

मैदानातील प्रमुख खेळाडू

PTM - A:
यशराज कांबळे प्रथमेश हेरेकर रोमारियो ओमकार मोरे अमीन कझीर ऋषिकेश मेथे पाटील
वेताळ तालीम मंडळ:
आकाश माळी राहुल पाटील ऋतुराज सूर्यवंशी योकिम विशाल कुरणे संदेश कासार
🏆 लढवय्या खेळाडू: प्रतीक बदामे (PTM)

अत्यंत झुंजार खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल गौरवण्यात आले.

🔥 उद्याचा दुसरा उपांत्य सामना

शिवाजी तरुण मंडळ Vs दिलबहार तालीम मंडळ

फुटबॉल शौकिनांचे या महामुकाबल्याकडे लक्ष!
थोडे नवीन जरा जुने