कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन
विद्युत विभाग आढावा बैठक: महत्त्वपूर्ण निर्णय
महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये सोलर यंत्रणा बसविणार : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
महानगरपालिकेच्या सर्व कार्यालये आणि पंपिंग स्टेशनमध्ये सौरऊर्जा (सोलर) यंत्रणा बसविण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून विद्युत बिलामध्ये कपात होऊन महापालिकेचा मोठा खर्च वाचेल, अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
⚠️ LED पथदिव्यांबाबत कडक पवित्रा
EESL कंपनीकडून मागील एक वर्षापासून एलईडी पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम समाधानकारक होत नसल्याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरात वाढत्या पथदिव्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीसोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची कार्यवाही अंतीम टप्यात असून शासनामार्फत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे महासभेच्या मान्यतेनंतर करण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले.
संबंधित संस्थेने नियुक्तीपूर्वी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, बंद पडलेले दिवे तातडीने सुरू करण्यासाठी साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा आणि वर्कऑर्डर मिळताच शहरातील सर्व दिवे पूर्ववत सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. तसेच, विद्युत विभागातील तांत्रिक कामकाजासाठी गरजेनुसार एजन्सीमार्फत पदभरती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस उपस्थित अधिकारी:
- ✅ रविकांत आडसूळ (अतिरिक्त आयुक्त)
- ✅ रमेश मस्कर (शहर अभियंता)
- ✅ नारायण पुजारी (सहायक अभियंता)
- ✅ अमित दळवी (कनिष्ठ अभियंता)
