BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

पावसाळापूर्व नालेसफाई मोहीम

KMC नालेसफाई मोहीम - डिजीटल Newss कट्टा

पावसाळापूर्व नालेसफाई मोहीम

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन - आरोग्य विभाग

90
डंपर गाळ उठाव
292
लहान नाले सफाई पूर्ण
04
पोकलॅन्ड मशीन्स कार्यरत

शहरातील नाले सफाई मधून आजवर ९० डंपर गाळ उठाव!

कोल्हापूर | १४ मे:

शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम जोमाने सुरु आहे.

📍 सध्या येथे काम सुरू आहे:

महालक्ष्मी हॅाल (मंगळवार पेठ), मनोरा हॅाटेल (राजेंद्र नगर), सुखसागर हॅाटेल (लक्ष्मीपुरी) व जयंती पंपिंग स्टेशन (लॅाग पोकलेन द्वारे प्लॅस्टिक व गाळ काढण्याचे काम).

🏠 सफाई पूर्ण झालेले प्रमुख परिसर:
क्रांतिसिंह नाना पाटीलनगर बापूराम नगर सुर्वेनगर साळोखेनगर मोहिते कॉलनी हडको कॉलनी राजेंद्रनगर संपूर्ण परिसर हॉकी स्टेडियम लक्ष्मीपूरी कोंबडी बझार राजारामपूरी जनता बझार साईस एक्सटेशन जाधववाडी कपूर वसाहत शिवराज कॉलनी कारंडे मळा कदमवाडी जाधववाडी रोड भोसले मळा साळोखेमळा समाज कल्याण ऑफिस
नागरिकांना आवाहन:

शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

© 2026 डिजीटल Newss कट्टा | रिपोर्टर: अजय शिंगे

थोडे नवीन जरा जुने