कोल्हापूर महानगरपालिका आयोजित
महापौर चषक फुटबॉल स्पर्धा
श्री शिवाजी तरुण मंडळाची दिमाखात अंतिम फेरीत धडक; दिलबहार तालीम मंडळाचा ३-० ने पराभव
श्री शिवाजी तरुण मंडळ
दिलबहार तालीम मंडळ
येथील महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या दुसऱ्या चुरशीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा ३-० असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पूर्वार्ध आणि उत्तरार्धात केलेल्या शिस्तबद्ध चढायांच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने सामन्यावर आपले वर्चस्व राखले.
सामन्याचा वृत्तांत:
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, १४ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या सिद्धेश साळोखेने दिलेल्या अचूक पासवर करण चव्हाण-बंदरे याने सुरेख गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर दिलबहार तालीम मंडळाने गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र मध्यंतरापर्यंत शिवाजी तरुण मंडळाने आपली १-० अशी आघाडी कायम राखली.
उत्तरार्धात खेळाचा वेग अधिकच वाढला. सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरेच्या पासवर संकेत नितीन साळोखे याने चेंडूला जाळीचा मार्ग दाखवत शिवाजी तरुण मंडळाची आघाडी २-० अशी भक्कम केली. दिलबहारच्या खेळाडूंनी सामन्यात परतण्यासाठी अनेक आक्रमक चढाया केल्या, परंतु शिवाजीच्या बचाव फळीने त्या यशस्वीपणे मोडून काढल्या. सामन्याच्या जादा वेळेत (८०+४ मिनिटे) हर्ष जरगच्या पासवर संकेत जरगने तिसरा गोल डागत शिवाजी तरुण मंडळाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
गोल नोंदवणारे खेळाडू:
शिवाजी तरुण मंडळ खेळाडू:
दिलबहार तालीम खेळाडू:
🏅 लढवय्या खेळाडू
स्वयम साळोखे
(दिलबहार तालीम मंडळ)
🏆 महाअंतिम सामना
शिवाजी तरुण मंडळ
Vs
वेताळमाळ तालीम मंडळ
१७ मे, रविवार
सायंकाळी ४:०० वाजता
उद्याचे प्रदर्शनीय सामने
कोल्हापूर पोलीस
Vs
कोल्हापूर महानगरपालिका
महापालिका पदाधिकारी
Vs
महापालिका अधिकारी
