BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
जिल्हा माहिती कार्यालय (जिमाका), कोल्हापूर शासकीय प्रसिद्धीपत्रक
कोल्हापूर
दिनांक: १७ (जिमाका)

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जिल्ह्यात पडणाऱ्या पर्जन्यमानामुळे पूरस्थिती निर्माण होते. या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

राजाराम बंधारा येथे प्रत्यक्ष पाहणी:

राजाराम बंधारा येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज आपत्कालीन साहित्य आणि प्रात्याक्षिकाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल, दुरुस्ती, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या उद्देशाने तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सामील झालेल्या आपदा मित्र व आपदा सखींची आस्थापूर्वक चौकशी करून, त्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी सविस्तर जाणून घेतल्या.

अत्याधुनिक रेस्क्यू साहित्याची प्रत्यक्ष तपासणी:

जिल्हाधिकारी श्री. राठोड यांनी खालील आपत्कालीन यंत्रसामग्री आणि बचाव साहित्याची बारकाईने पाहणी केली:

रेस्क्यू बोट (Rescue Boat) लाईफ जॅकेट (Life Jacket) लाईफ रिंग (Life Ring) सॉकर कटर (Soccer Cutter) हायड्रोलिक कटर (Hydraulic Cutter) रेस्क्यू रोप (Rescue Rope) इमर्जन्सी फ्लोटींग लाईट्स
याप्रसंगी उपस्थित प्रमुख अधिकारी व मान्यवर:

या महत्त्वपूर्ण पाहणी प्रसंगी करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार, अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह आपदा मित्र व आपदा सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने