BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

१३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये गती आणा - आ.राजेश क्षीरसागर

१३ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना - न्यूज
कोल्हापूर | १५ मे २०२६

१३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये गती आणा - आ.राजेश क्षीरसागर

काम न करणाऱ्या ठेकेदारांना 'ब्लॅकलिस्ट' करण्याचा सज्जड इशारा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करवीर तालुक्यातील १३ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची गती वाढविण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

३४३ कोटी
एकूण निधी
५१%
काम पूर्ण
१३
लाभाची गावे

यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले की, "३४३ कोटी रुपयांच्या या योजनेमुळे परिसरातील १३ गावांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ होणार आहे. केवळ निधी वेळेत प्राप्त न झाल्यामुळे कंत्राटदारांनी या कामांमध्ये अजिबात हयगय करू नये. मंत्रालयस्तरावर उर्वरित निधी मिळवण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन."

"कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल!"

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील यांनी योजनेचे ५१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. उर्वरित काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर आमदार क्षीरसागर यांनी बैठकीत भर दिला.

बैठकीस उपस्थित मान्यवर:
  • • डॉ. विजय राठोड (जिल्हाधिकारी)
  • • डॉ. जास्मिन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.)
  • • गजानन गुरव (निवासी उपजिल्हाधिकारी)
  • • डी. के. पाटील (कार्यकारी अभियंता, MJP)
  • • पी. एच. गायकवाड (उपअभियंता)
  • • संबंधित कंत्राटदार व अधिकारी
थोडे नवीन जरा जुने