BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार

पी. एम. सूर्यघर योजना - कोल्हापूर न्यूज
कोल्हापूर | १५ मे २०२६ | (जिमाका)
शून्य वीज बिल मोहीम

पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार

- मंत्री हसन मुश्रीफ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ निश्चयातून साकारलेली पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवून पर्यावरण संरक्षण तसेच महागाईच्या कालखंडामध्ये ग्राहकांना शून्य वीज बिल आणून दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

"या योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी इच्छुक नागरिकांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे."

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कागल तालुक्यातील पाणंद रस्ते, जयसिंगराव तलाव पाणीपुरवठा आणि महावितरणच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. कागल तालुक्यातील ८६ गावांत किमान एक किलोमीटरपर्यंतचे पाणंद रस्ते तातडीने तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जयसिंगराव तलावातील पाणी पातळी वाढवण्यासाठी लवकरच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थोडे नवीन जरा जुने