BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सामाजिक कृतज्ञता सप्ताहाचा प्रारंभ

आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सामाजिक कृतज्ञता सप्ताहाचा प्रारंभ

पांजरपोळ येथे गोसेवा व चारा वाटप

कोल्हापूर:

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील गटनेते मा. श्री. आदिल फरास साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'सामाजिक कृतज्ञता सप्ताहाचा' आज ५ मे रोजी उत्साहात प्रारंभ झाला. 'वाढदिवस सेवाकार्याचा' हा वारसा जपत, राजकीय शक्तीप्रदर्शनापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोसेवेने उपक्रमाची सुरुवात

या सप्ताहाचा श्रीगणेशा आज सकाळी १०:३० वाजता कोल्हापूर येथील पांजरपोळ गोशाळेत गोमातांना चारा वाटप करून करण्यात आला. मुक्या प्राण्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करत यावेळी कार्यकर्त्यांनी सेवाकार्य केले.

उपस्थित मान्यवर:

या प्रसंगी माजी नगरसेवक सतीश लोळगे, रामेश्वर पतकी, युवराज साळोखे, सचिन लोहार, बजरंग देवकर, निरंजन पवार, शितल तिवडे, सोनाली कानविंदे, बाबू घाटगे, प्रसाद जमदग्नी, सचिन सावेकर, दिलीप टोणपे, राजेश चव्हाण, महेश टोपले, गब्बर मुल्ला, बाबू पांढरे, राऊत काका, शाहरुख आणि शितल तिवडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील कार्यक्रमांचे नियोजन

बुधवार, ६ मे (वाढदिवस मुख्य दिवस)
  • 📍 दुपारी १२:३० वाजता: सीपीआर चौक येथे सर्वसामान्यांसाठी 'कोल्हापुरी थाळी' वाटप.
  • 📍 संध्याकाळी ७:०० वाजता: साहेबांच्या संपर्क कार्यालयात अभीष्टचिंतन सोहळा व शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
गुरुवार, ७ मे (सांगता दिवस)
  • 📍 सकाळी १२:३० वाजता: शिरोली एमआयडीसी परिसरात गरजू कुटुंबांना ब्लँकेट, चटई आणि टॉवेलचे वाटप.

राजकीय शक्तीप्रदर्शनापेक्षा सामाजिक कार्याला प्राधान्य देऊन साजरा होत असलेल्या या वाढदिवसाचे कोल्हापूर शहरातून विशेष कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने