BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड' ने सन्मान

डॉ. संजय डी. पाटील - सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२६
सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२६

डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड' ने सन्मान

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि तीन विद्यापीठांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा गौरव

महत्त्वाचे ठळक मुद्दे

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरव
शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा सन्मान
ग्रामीण शिक्षण परिवर्तनाचे अमूल्य योगदान

स्थळ:

हयात रीजेन्सी, पुणे

आयोजक:

नवभारत - नवराष्ट्र

पुणे

ग्रामीण भागापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचवून त्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना प्रतिष्ठित ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. ग्रामीण शिक्षण परिवर्तनाच्या या कार्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते डॉ. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवभारत - नवराष्ट्र च्या वतीने पुण्यातील हयात रीजेन्सी येथे 'सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड' सोहळा संपन्न झाला. आपल्या कार्यातून सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या व सामाजिक ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीमत्वांना यावेळी सस्कृंत करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला.

उपस्थित मान्यवर:

यावेळी रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रांट, नवभारतचे ग्रुप एडिटर संजय तिवारी, प्रेसिडेंट ए. श्रीनिवासन, सुशील मोझर, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि तीन विद्यापीठांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक शिक्षण संस्थांमधून ४७ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून लाखो विद्यार्थी पास आऊट झाले आहेत. विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला आकार देण्याचे कार्य डॉ. पाटील अविरतपणे करत आहे.

५०+

शिक्षण संस्था

४७,०००+

सध्या कार्यरत विद्यार्थी

लाखो

माजी विद्यार्थी (Pass Out)

त्याचबरोबर डॉ. पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी प्रयोग यामध्यमातूनही शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. समाजहितासाठी विशेषत: शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठी करत असलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

डॉ. संजय डी. पाटील यांचे मनोगत:

"गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण, कृषी व सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. हा सन्मान आपल्या सहकाऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि समाजाच्या विश्वासाचा आहे. समाजासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाली आहे."

© २०२६ | सर्व माहिती सुरक्षितरित्या जतन केली आहे.

थोडे नवीन जरा जुने